“Shakambari Navratri Mahatva शाकंबरी देवीचे महत्व

मित्रहो, श्री जगन्माता तुळजाभवानीचा महिमा वर्णन करायला शब्दही अपूरे आहेत. भवानीमातेचेच एक रूप असलेली शाकंबरी देवी ही वनस्पती, फळ, फुले, भाज्या यांची देवता आहे असे म्हणले तर वावगे होणार नाही. पौराणीक कथांमधुन शाकंबरी माते बद्यलचा उल्लेख आढळतो. तुळजापूर येथे शांकंबरीदेवीचे नौरात्र अतीशय भक्तिभवाने आणि उत्साहात साजरे केले जाते. नवरात्रीच्या या दिवसांत नित्य पौराणिक असे धार्मिक विधी केले जातात. तसेच याकाळात देवी निद्राअवस्थेत असते असे समजले जाते. यादिवसात माता अन्नपूर्णेची उपासना केली जाते.

पौराणिक काळात दानवांच्या उपद्रवाने पडलेल्या दुष्काळामुळे जनतेचे अतोनात हाल झाले होते. परंतु माता भवानी जेव्हा जागृत झाली तेव्हा तिने हे विदारक दृष्य पाहिले आणि तिला अतिशय दुःख झाले. तेव्हा मातेच्या डोळयातून अश्रू वाहू लागले आणि त्या अश्रूंच्या द्रवण्याने दुष्काळ शमला गेला. अशा त-हेने नउ दिवस अश्रू द्रवत राहिले आणि जगभरात परत वनस्पती, भाज्या आणि फळे यांची पैदास झाली. अशा त-हेने भवानीमातेचे शाकंबरी हे नाव जगविख्यात झाले.

तिला असलेल्या 1000 डोळयातून अश्रू द्रवले म्हणुनच तिला शताक्षी असेही संबोधण्यात येते. याकाळात तंत्र-मंत्र साधना करण्या-या तांत्रिक साधकांनासाठी याकाळाचे अनन्यसाधारण महत्व समजले जाते. सिद्धी प्राप्त करण्यासाठी तात्रिक या दिवसात धार्मिक विधी संपन्न करून साधना करतात.

शाकंबरी मातेचा नवरात्रकाळ हा तुळजापूर मंदिरात अतिषय श्रद्धेने आणि पारंपारीक पूजाविधी करून संपन्न केला जातो. याकाळात नउ दिवस नेहमीपेक्षा वेगळा पूजा विधी असतो. याकाळात नेहमीप्रमाणे पंचांमृताने देवीचा अभिषेक केला जात नाही. हा काळ देवीचा निद्राकाळ समजला जातो.

अशा या शाकंबरी मातेसमोर समस्त विश्व नतमस्तक आहे.”

Tuljabhavani Live Darshan

Online Pooja Seva, Hotel Booking, Daily Pooja Vidhis, Darshan Program, About Mandir, How to reach, Photo Gallery, Contact, Blog